Tuesday, October 30, 2007


३-४ वर्षांपूर्वी पुन्हां एकदा राजेश ख़न्ना-अमितभचा ‘आनंद' बघितला,कितव्यांदा ते नाही आठवत. त्याच सुमारास तात्यासाहेबांनी नाट्यरुपांतर केलेलं ‘आनंद' ही वाचनात आलं.
‘आनंद', . . . प्रत्येक वेळी आनंद बघताना एक नवीनच ‘आनंद’ कळत गेला, सापडत गेला.
‘आनंद' ची व्यक्‍तिरेखा सर्वप्रथम समोर आली ती कॅन्सरसारख्या रोगाशी लढतानाही म्रुत्युलाच क्षणोक्षणी मारणार्‍या एका माणसाची म्हणून, आणि म्हणूनच लढायची वेळ येते तेंव्हा ‘आनंद' आठवतो, त्याच बिनधास्त जगणं अन्‌ जगाला अखंडपणे आनंदाचे क्षण देण्याची धडपड आठवते.
आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना आपल्याल ‘घडवत' असते. तसंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं. ‘आनंद' ची प्रत्येक revision मला घ्डवत होती. एक स्वप्न आकार घेत होतं . . . मला ‘आनंद' व्हयचंय ! माझ्या सभोवतालच्या प्रत्येकाल मझा आधार आसावा. कोणालही रडायला मझा खांदा आसावा. ‘सगळ्यांना आपल्यात समावून घेण्याची क्षमता असलेलं’ हे स्वप्न होतं माझं!
स्वप्न तर बघितलं, . . . पण ते जगायचं, पूर्ण करायच ठरवलं, तेंव्हा मी काय होतो?
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत नापास झालेला, लोकांसाठी फक्‍त problems, निर्माण करणारा मुलगा. खूप प्रयत्नपूर्वक मी स्वतःला बदललं. ज्या मुलाला बोटावर मोजण्याइतकेही जवळचे मित्र नव्हते, त्याच मित्रपरिवार वाढायला लागला. ह्या स्वप्नानं मला खूप काही दिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ‘इतरांसाठी जगायचं असतं’ हे शिकवलं.
पण आता ४ वर्षाँनंतर . . . पुन्हा एकद मी हरलो, नापास झालो, ‘आनंद’ हा अवतार आहे आणि आपण एक अतिसामन्य माणूस याची जाणिव झाली.
आता मी नुसतंच माणसासारखं जगायचं ठरवलंय, म्हणजे मी ‘आनंद' विसरलो अस नाही. पाण आता तो माझा फक्‍त एक हिस्सा आहे आणि मी ‘आनंद' नाहीच! कारण . . . मी अजूनही स्वर्थी आहे.
हा ‘आनंद’ आपल्या प्रत्येकात आहे, त्याचा शोध कोणी कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माझ्या्तला ‘आनंद' सापडला आणि त्याने माझं आयुष्यचं बदलून टाकलं.
माझं ‘आनंद' बनण्याचं स्वप्न, प्रयत्न कवितेच्या रुपात आपल्यासाठी. . . .
“आनंद"
जगीन प्रत्येक मनात आनंद म्हणून
राहिन प्रत्येक मनात आठवण बानून
दुःखाची नसेल सोबत कुठल्याच क्षणाला
सुखाचा देईन ओलावा प्रत्येक मनाला !!

ठेवेल प्रत्येकजण मला आठवणीत,
मी म्हणून, . . . माणूस म्हणून !
दिसेल प्रत्येकला सुर्य-स्वर्ग माझ्यात,
पण नसेल मोह माझ्या सहवासाचा,
असतील प्रत्येकाला स्वप्न मी होण्याची, आकाश बनण्याची
जाणवेल शितलता चंद्राची मझ्यात,
तरी नसेल इछा तिला मिठीत घेण्याची !!

असेल फक्‍त जाणिव
माझी. . . माझ्या आधारची
जाणवेल माझं प्रेम प्रत्येक श्वासात
तरीही नसेल मोह . . . श्वास घेण्याचा !

तेंव्हा मी असेन तिथे
माझा श्वास तुला द्यायला
तेंव्हा जाणवेल तुला माझं अस्तित्व
मॄत्युच्या पलिकडे दिसणारं. . .

सोडेन माझा श्वास
तुझ्या श्वासात मिसळून
पाहिन वाट उद्याची, पुनः जन्माची
पुन्हा एकदा जगण्यासाठी. . .

ह्या वेळी असेन एक माणुस सामान्य
तुझ्याकडे, त्याच्याकडे आधार शोधणारा
आधार शोधतांना अनेकदा पडणारा
आणि . . . आधार मिळाल्यावर सिंह होउन गरजणारा !!
त्यावेळी मी प्रयत्न करेन जगण्याचा ‘तू’ बनून
तेंव्हा तू प्रयत्न करवास , खुप मोठं होण्याचा, मला पंखाखाली घेण्याचा !
मी थांबीन विसाव्याला तुझ्याजवळ थोडावेळ, घेईन अनुभूती, तुझ्या स्पंदनांची
बघीन ठोडी स्वप्न - नव्याने जगायला, वाकेन, मोडेन – पुन्हा नव्याने धावायला !!

पण . . . पण तेंव्हाही तू नसशील तर?
तर . . . तर मलाच व्हवं लागेल मोठ . . . खुप मोठं
व्हावं लागेल तोच सुर्य – तोच स्वर्ग,
ठेवावी लागतील मनाची दारं उघडी,
तुझ्यासाठी, त्याच्यासाठी. . . प्रत्येकाचंसाठी !!

सांग ना, तू असशील ना तेंव्हा ?
मला थोपटायला, निजवायला, मला मिठीत घेऊन कुर्वाळायला
मी रडलो तर माझे डोळे पुसायला, माझ्या बरोबर रडायला
आणि रडता-रडता माझ्यात हरवायला !

सांग ना, आसेल ना तुझी जणिव
माझा श्वास जिवंत थे्वायला ?
असेल ना तुझा आधार
मला पुन्हा रुजवायला ?

कदाचित तू नसशील तिथे
तरीपण . . . माझी एक आपेक्षा
तुझ्यात असाण्याची, माझा आत्मा असण्याची !

आणि तू असतांना सुद्धा
कदाचित मलाच व्हावं लागेल मोठं
द्यावा लागेल तुला हात,
द्यावाच लागेल मझा श्वास

तरी पण घेईन मी पुःजन्म
पुन्हा जुन्याच अपेक्षेने
एक ‘माणूस’ होण्याच्या
तुझ्या पंखाखाली जगण्याच्या
त्यासाठी कदाचित पहवी लागेल मला वाट
तुझी, तू आकाश बनण्याची
विसरून स्वतःला तुझ्यात,
‘आनंद' होऊन. . . फक्‍त ‘आनंद' होऊन जगण्याची!!

-- ॐकार बापट

1 comment:

sonal m m said...

omkar phar varshanni punha tujha 'anand' vachun chhan vatala...junya aathvani dokyat gholayala laglya.